महाराष्ट्र गोसेवा आयोगा मार्फत राबविण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी राज्यस्तरीय गो साक्षरता अभियानांतर्गत
पहिल्या टप्प्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पर्यायाने भावी समाजाच्या उज्वल भविष्यासाठी आगामी काळात विविध स्तरावर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
सदर अभियानाचा भव्यदिव्य श्रीगणेशा चऱ्होली, आळंदी रोड, साई मंदिराजवळील गेनबा सोपानराव मोझे संस्थेच्या श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयात दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी अतिशय उत्साहात आणि अतीशय रमणीय वातावरणात पार पडला.
या उपक्रमाअंतर्गत सदर शाळेत इयत्ता ५ वी ते इयत्ता ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व या स्पर्धा घेण्यात आल्या.. ३५० पेक्षा अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी या स्पर्धेत अतीशय उत्साहाने भाग घेतला.
या स्पर्धेची सांगता २४ जानेवारी २०२४ रोजी दुपारी 3: 30 ते सायंकाळी 5: 30 या वेळात शाळेच्या विशाल प्रांगणात होणार आहे त्यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांच्या तसेच देशी गोवंश या विषयातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय उल्हासपूर्ण वातावरणात सांगता होणार आहे.
देशी गोवंश या विषयावर आधारित… दिलेल्या अनेक विषयांवर विद्यार्थ्यांनी आपआपल्या कल्पना शक्तीचा पुरेपूर वापर करीत उपस्थित परीक्षकांना, शिक्षकांना आणि अध्यक्षांना अंतर्मुख करणारे अनेक मुद्दे यावेळी आपआपल्या पद्धतीने उपस्थित केले तसेच सर्वांसमक्ष विविध संकल्प देखील अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी केले.
विद्यार्थ्यांचे हे अचंबित करणारे मुद्दे आणि स्पष्ट विचार पाहून. ही भविष्यातील अनेक क्रांतिकारी बदलांची नांदीच असल्याचे मत या वेळी गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. शेखरजी मुंदडा यांनी मांडले.
त्याचबरोबर शालेय अभ्यासक्रमात अशा प्रकारचे समाजोपयोगी आणि विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी उपयुक्त अशा या महत्त्वाच्या विषयांचा अभाव असल्याची खंत देखील अनेक शिक्षकांकडून यावेळी व्यक्त करण्यात आली परंतु त्याचबरोबर अशाप्रकारे गोसेवा आयोगा मार्फत राबविण्यात येणाऱ्या अभीयानाची भरभरून स्तुती देखील त्यांनी यावेळी केली.
तसेच आपल्या परिचित इतरही शाळांमध्ये सदर उपक्रम राबविण्यासाठी शाळेची आवश्यक यंत्रणा सदैव पाठीशी असल्याचे आश्वासन मुख्याध्यापक श्री. गायकवाड सरांनी यावेळी उपस्थित गोसेवा आयोगाच्या अध्यक्षांना दिले.
नव्यानेच स्थापित झालेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या या अतीशय महत्वकांक्षी अशा अभीयानाची सुरूवातच इतक्या सकारात्मक आणि परिणामकारक पद्धतीने झाल्याने अध्यक्ष श्री. शेखरजी मुंदडा यांनी समाधान व्यक्त केले आणि भविष्यात अशाप्रकारे गो साक्षरता साठी समाज प्रबोधनासाठी अजूनही वेगवेगळ्या विषयावर विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन सर्वांसमक्ष संयोजकांना दिले.
श्री.शेखर मुंदडा
अध्यक्ष: महाराष्ट्र गोसेवा आयोग