महाराष्ट्र राज्यामध्ये पशुंचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करणे व त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करणे
गोसदन, गोशाळा, पांजरपोळ व गोरक्षण संस्थांची नोंदणी करणे. अस्तित्वात असलेल्या कायद्याअन्वये पशुंच्या संरक्षणाची सुनिश्चिती करणे
गोसदन, गोशाळा, पांजरपोळ व गोरक्षण संस्था यांच्या विकासासंबंधीचे राज्यशासनाचे कार्यक्रम व योजना यांची अंमलबजावणी होईल हे सुनिश्चित करणे
महाराष्ट्र राज्यातील देशी जातींच्या पशुंच्या विकासामध्ये संस्थांच्या सक्रिय सहभागाची सुनिश्चिती करणे
पशुआरोग्य सेवांचे प्रचालन करणे
अस्तित्वात असलेल्या कायद्यांचे उल्लंघनाकरिता जप्त केलेल्या पशुंची काळजी व व्यवस्थापनाची सुनिश्चिती करणे
नोंदणीकृत संस्थेद्वारे देखभाल करण्यात येणाऱ्या दुर्बल, वयस्क व रोगग्रस्त पशुंचे योग्य व्यवस्थापन, काळजी व उपचार यांची सुनिश्चिती करणे
पशुव्यवस्थापनासंबंधी शेतकरी व इतर हितसंबंधित व्यक्ती यांच्याकरिता जनजागृती व प्रशिक्षण यांची अंमलबजावणीची सुनिश्चीती करणे
महाराष्ट्र राज्याच्या गोवंश प्रजनन धोरणाच्या अंमलबजावणीची सुनिश्चिती करणे व त्याचे संनियंत्रण करणे
नोंदणीकृत संस्थांचे पर्यवेक्षण व निरीक्षण करणे
वैरण व वैरणीचे बियाणे यांच्या सुधारित प्रकारांच्या लागवडीचे व उत्पादनाचे आणि कुरण विकास कार्याचे प्रचालन करणे
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर आणि पशुवैरण विकास कार्यक्रमांशी संबंधित इतर संशोधन संस्था यांच्या मध्ये समन्वय साधणे आणि नविन वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करणेसाठी संस्थांच्या सक्रिय सहभागाची सुनिश्चीती करणे
जाती सुधारणा, वैरण विकास आणि मल, मुत्र व बायोगॅस, इत्यादी वर आधारित उद्योग आणि यासाठी विद्यापीठे आणि इतर संशोधन संस्था यांच्याशी समन्वय साधणे आणि नवीन वैज्ञानिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचे कामी त्यांचे सहाय्य घेणे.
आर्थिकदृष्टया कमकुवत संस्थांना बळकट करणेसाठी सहाय्यकारी ठरतील अशा उपाययोजना सुचविणे.
संस्थांना आर्थिक सहाय्य देणे.
कोणत्याही संस्थांच्या कामकाजातील तक्रारींची चौकशी करणे
पशुंवरील क्रुरतेला प्रतिबंध करण्याच्या कृतींचा आढावा घेणे
जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या कामाचा आढावा घेणे