Maharashtra Goseva Ayog

  1. Home
  2. »
  3. बैठक
  4. »
  5. सह्याद्री अतिथीगृह,मुंबई येथे बैठक

सह्याद्री अतिथीगृह,मुंबई येथे बैठक

दि.10 जानेवारी रोजी सह्याद्री अतिथीगृह,मुंबई येथे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री मा.श्री.राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र गोसेवा आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गोसेवा आयोगासंदर्भाने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मंत्रीमहोदयांना मागील सहा महिन्यांमध्ये गोसेवा आयोगामार्फत करण्यात आलेलं कार्य दाखवण्यात आले. मागील सहा महिन्यांत हे काम असतांना जाणवलेल्या अडचणी आम्ही मांडल्या.प्रत्येक मुद्द्यावर सर्व पदाधिकार्‍यांसोबत सविस्तर चर्चा झाली. दि.31 जानेवारी पर्यंत सर्व अडचणी दूर करण्याचे आदेश यावेळी मंत्रीमहोदयांनी दिले.

अतिशय सकारात्मक अशी चर्चा झाली असून मा.मंत्रीमहोदयांच्या भक्कम पाठींब्याच्या आणि तात्काळ अंमलबजावणीच्या जोरावर महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे कार्य महाराष्ट्रभर जोमाने सुरु राहणार असा नक्कीच विश्वास आहे.

या बैठकीस मा.राखाकृष्ण विखे पाटील साहेब, पशुसंवर्धनचे आयुक्त, सचिव श्री.तुकाराम मुंडे जी, विश्व हिंदू परिषदेचे श्री.शंकर गायकर जी यांना आयोगातर्फे गोमाता भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या बैठकीस गोसेवा आयोगाचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच डॉ. माधव वीर सह सचिव.वित्त विभाग.

श्री भिमनवार परिवहन आयुक्त.श्री हेमंत वसेकर आयुक्त, प.स.श्रीराजेश गोविल उपसचिव गृह विभाग, श्री.अभिजित शिवधरे.(a2g ll &l), श्री.स.ज सवते.(आ.स.पदून.3), श्री.डॉ.दिनेश लोखंडे (स.अ.प.म.मा.), डॉ.सोमनाथ हनुमंत माने, श्री विवेक होशिंग उप सचिव.( वने). आयोगाचे अशासकीय सदस्य श्री.संजयजी भोसले, श्री.सुनिलजी सूर्यवंशी, श्री.उद्धवजी नेरकर, श्री.सनतजी गुप्ता यांची सुद्धा उपस्थिती होती. 

श्री.शेखर मुंदडा 

अध्यक्ष: महाराष्ट्र गोसेवा आयोग