Maharashtra Goseva Ayog

  1. Home
  2. »
  3. महाराष्ट्रातील प्रमुख गोवंश

गवळाऊ गाय

गवळाऊ गाय ही गायीची प्रजाती महाराष्ट्रातील विदर्भ भाग आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये आढळते. हा देशी गोवंश आहे. हा गोवंश नंद गवळी या लोकांकडून पाळला जातो आणि इतर शेतकऱ्यांना ते बैल आणि गाय विकतात. तो त्यांचा व्यवसाय आहे. ह्या गायीच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण 5.5 इतके असते. गवळाऊ गायी कृष्णाच्या काळातील असल्याचे सांगितले जाते. देशी गायीचे गोमूत्र आणि शेण जमीन, पिकांसाठी-शेती साठी खुप उपयुक्त असते. त्यामुळे देशी गोवंश वाचविणे आज गरजेचे झाले आहे.

लाल कंधारी गाय

लाल कंधारी गाय हा एक भारतीय गोवंश असून नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात हिची निर्मिती झालेली असून, संपूर्ण महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकात मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. यांची दूध देण्याची क्षमता सामान्य असून शेतीकामासाठी बैल उपयुक्त आहे.

खिल्लार किंवा खिल्लारी गाय

खिल्लार किंवा खिल्लारी गाय हा शुद्ध भारतीय गोवंश असून, प्रामुख्याने महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर व या जिल्ह्यांच्या सीमेलगत असणाऱ्या कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो.

डांगी गाय

डांगी गाय हा एक भारतीय गोवंश असून महाराष्ट्रातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने आढळतो. यांची दूध देण्याची क्षमता ही जवळपास ६ लिटर (एका वेळेचे) पर्यंत असून शेतीकामासाठी बैल उपयुक्त आहे. ही प्रतिकूल परिस्थितीत उत्तम टिकणारी गाय आहे. ठाणे जिल्हा देखील जवळ असल्याने त्या भागात देखील या गाई पाहायला मिळतात.

कोंकण कपिला गाय

कोंकण कपिला हा शुद्ध भारतीय गोवंश असून मुख्यतः महाराष्ट्रातील कोंकण प्रांत, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पालघर जिल्ह्यात आढळतो.

कठाणी गाय

कठाणी गाय हा शुद्ध भारतीय गोवंश असून, याचे मूळ महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतातील चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा तसेच गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतो. गवळाऊ गायी नंतर भारतीय कृषी संशोधन परिषद ने प्रमाणीकरण केलेला विदर्भातील हा दुसरा गोवंश आहे. हा दुहेरी हेतूचा गोवंश म्हणून ओळखला जातो.
ग‌डचिरोली जिल्ह्यातील चामोर्शीजवळील अनखोडा येथे गोंड आदिवासी भातासोबत कठाणी; एक रब्बी हंगामातील पीक घेतात. या पिकाच्या नावावरूनच या जातीच्या जनावरांना कठाणी, असे नाव पडले.

देवणी गाय

देवणी गाय हा एक भारतीय गोवंश असून लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात जास्त प्रसिद्ध आहे. ही गाय लातूर, उस्मानाबाद, परभणी सह कर्नाटकातील बिदर मध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. यांची दूध देण्याची क्षमता १०-१५ लिटर प्रतिदिन असून शेतीकामासाठी बैल पण उपयुक्त आहे.