Maharashtra Goseva Ayog

  1. Home
  2. »
  3. कार्यक्रम
  4. »
  5. महाराष्ट्र गोसेवा आयोग मुख्यालयाचे उदघाटन

महाराष्ट्र गोसेवा आयोग मुख्यालयाचे उदघाटन

आज पुणे येथे महाराष्ट्र गोसेवा आयोग मुख्यालयाचे उदघाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास व व्यवसाय मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या हस्ते महाराष्ट्र गोसेवा आयोग अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. या कार्यक्रमास पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांची देखील विशेष उपस्थिती होती. माझ्यावर विश्वासाने जबाबदारी सोपविणारे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबद्दल अंतःकरणात निस्सीम कृतज्ञता भाव आहे. यावेळी महाराष्ट्र गोसेवा आयोग सर्व सदस्य श्री.संजय भोसले, श्री.सुनील सूर्यवंशी, श्री. उद्धव नेरकर, डॉ. नितीन मार्कंडेय व आयुक्त, पशुसंवर्धन डॉ. हेमंतजी वसेकर उपस्थित होते
Mr. Shekhar Mundada
President: Maharashtra Go Seva Commission