महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने गोवर्धन गोवंश समिती योजनेअंतर्गत 2023-24 साठी पात्र असणार्या महाराष्ट्रामधील 152 तालुक्यातील 1 गोशाळा याप्रमाणे 152 गोशाळेना अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली.
सुमारे 15 लाख ते 25 लाख रुपये अनुदान प्रत्येक तालुका निहाय गोशाळेना देण्यात येणार आहे. या अनुदानाचे नियम, मिळालेले अनुदान वापरायचे निकष अशा सर्व बाबी कायदेशीर रित्या समजून सांगण्यासाठी आज सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.