Maharashtra Goseva Ayog

  1. Home
  2. »
  3. आमच्याबद्दल

महाराष्ट्र गोसेवा आयोगाविषयी

महाराष्ट्र राज्यामध्ये देशी गोवंश संवर्धन, संरक्षण व कल्याण करण्यासाठी आणि त्यासाठी कार्यरत असणा-या संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी, गोसेवा आयोग गठित करण्यात आला आहे.

अधिनियमान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि नेमून दिलेले कार्य पाडण्यासाठी दि.०१.०९.२०२३ चे अधिसूचनेद्वारे ” महाराष्ट्र गोसेवा आयोग ” म्हणून २२ सदस्यांचे मंडळ गठित करण्यात आलेले आहे. आयोगावर विविध शासकीय विभागातील १४ पदसिध्द सदस्य आहेत. यामध्ये आयुक्त पशुसंवर्धन यांचा पदसिध्द सदस्य म्हणून समावेश आहे. आयोगावर पशुकल्याण, प्राणी व्यवस्थापन, पशुवैद्यकीय विज्ञान, दुग्धव्यवसाय, जैवतंत्रज्ञान, पणन, कायदा, सामाजिक कार्य किंवा आधुनिक तंत्रज्ञान या क्षेत्रातील तसेच अशासकीय संस्था, गोसदन, गोशाळा, पांजरपोळ व गोरक्षण संस्था इत्यादींचे प्रतिनिधी म्हणून ७ अशासकीय सदस्यांची नामनिर्देशनाने नेमणूक व त्यापैकी एका सदस्याची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. आयोगाचे सदस्य सचिव म्हणून कार्य करण्यसाठी सहआयुक्त पशुसंवर्धन हे पद असून इतर अधिकारी / कर्मचारी शासन नियुक्त असणार आहेत. आयोगाचे मुख्यालय आयुक्त पशुसंवर्धन कार्यालय, आंध्, पुणे-६७ येथील कार्यालयामध्ये दि. ०२.०९.२०२३ पासून तात्पुरत्या स्वरुपात स्थापित करण्यात आले आहे.
Edit Content
Edit Content